56 वर्षानंतर काँग्रेसमध्ये के. कामराज प्लॅन होणार यशस्वी?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

काँग्रेसमध्ये 56 वर्षानंतर कामराज प्लॅन यशस्वी होईल काय? प्रश्नावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आज (ता.15 जुलै) माजी काँग्रेस अध्यक्ष कामराज यांची जयंती आहे. त्यानिमीत्त काँग्रेसच्या गोटात चर्चांना उधाण आले असून काँग्रेस कामराज यांचा प्लॅन पुन्हा अंमलात आणणार काय? यावर चर्चा होताना दिसत आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये 56 वर्षानंतर कामराज प्लॅन यशस्वी होईल काय? प्रश्नावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आज (ता.15 जुलै) माजी काँग्रेस अध्यक्ष कामराज यांची जयंती आहे. त्यानिमीत्त काँग्रेसच्या गोटात चर्चांना उधाण आले असून काँग्रेस कामराज यांचा प्लॅन पुन्हा अंमलात आणणार काय? यावर चर्चा होताना दिसत आहे. 

1963चा काळ आणि 2019चा काळ कहाणी जवळपास सारखीच असल्याचे बोलले जात आहे. 1962ला भारत चीनविरुद्ध युद्धात हरल्यानंतर काँग्रेस सरकारवर विरोधक जोरदार टीका करत होते. निवडणुका तोंडावर आल्या होत्या. यावेळी काँग्रेसला पूर्ण मरगळ आली होती. पण, काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी नवी योजना तयार केली. या योजनेला नावही कामराज प्लॅन असे देण्यात आले. त्यांनी त्यावेळी सांगितले की, काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि काँग्रेस पक्षासाठी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करावे.

के. कामराज यांच्या या योजनेअंतर्गत पहिल्यांदा त्यांनी खुद्द राजीनामा दिला. त्यांच्यानंतर लाल बहादुर शास्त्री, जगजीवन राम आणि मोरारजी देसाई, एस के पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी राजीनामे दिले. काही नेत्यांनी आपल्या सरकारी पदांचाही त्याग केला. 06 मंत्री आणि 06 मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन सर्वजण पक्षासाठी कामाला लागले. के. कामराज यांची योजना काम करून गेली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक नवी टीम तर मिळालीच शिवाय पक्षाला के कामराज यांच्यासारखा लढवय्या नेता मिळाला. के. कामराज राजकारणात एवढे मजबूत झाले की, नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनविण्यात त्यांचाच मोठा हात होता. के. कामराज तीनवेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना 1976 मध्ये भारताच्या सर्वोच्च नागरी भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

सध्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाहिल्यास तशीच परिस्थीती दिसत आहे. लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर स्वतः राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, कामराज यांच्या जयंतीनिमीत्त राहुल गांधी के कामराज प्लॅन-2 ची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamraj plan 2 may Implementation in Congress