गोव्यात अपघातामुळे काणकोण कारवार महामार्ग बंद; हमरस्त्यावर वाहतूक कोंडी

सुभाष महाले
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

कुकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हमरस्त्याच्या बार्शे येथील पुलावर मडगावहून कारवारकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक टी. एन. ४७ एजे. २६६७ व बंगळूरहून पणजीकडे जाणाऱ्या केए ५१ एबी ३३७८ या प्रवासी बसची समोरासमोर टक्कर झाली.

काणकोण : मडगाव-कारवार हमरस्त्यावर बार्शे येथील अरूंद पूलावर आज (ता.२०) सकाळी झालेल्या तिहेरी वाहन अपघातामुळे हमरस्त्यावरील वाहतूक दोन तास खोळंबून राहिली. अपघातामुळे काणकोण व मडगाव बाजूकडे एक किलोमीटर लांब वाहनाची रांग लागली होती.

कुकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हमरस्त्याच्या बार्शे येथील पुलावर मडगावहून कारवारकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक टी. एन. ४७ एजे. २६६७ व बंगळूरहून पणजीकडे जाणाऱ्या केए ५१ एबी ३३७८ या प्रवासी बसची समोरासमोर टक्कर झाली. बसच्या पाठीमागून येणाऱ्या जी ए १० ए ११२४ या कारने बसला पाठीमागून धडक दिली. या अपघात कोणालाच गंभीर इजा झाली नाही. मात्र अरूंद रस्ता व पूल यामुळे क्रेनद्वारे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून पोलिसांना वाहतूक सुरळीत करावी लागली.

Web Title: Kanakon Karwar Highway closed due to an accident that road