काणकोणमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकच जास्त

सुभाष महाले
गुरुवार, 12 जुलै 2018

काणकोण : काणकोणात विद्यार्थी कमी, शिक्षक जास्त अशी सरकारी शाळाची परिस्थिती झाली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने काणकोणात सध्यातरी चार प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.गेल्या पाच वर्षात सरकारी प्राथमिक शाळाची पटसंख्या कमी झाल्याने 76 वरून 66 वर आली आहे. 66 प्राथमिक शाळांमध्ये जूनपर्यत फक्त 1138 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एकवीस शाळात पहिली ते चौथीच्या वर्गात फक्त चार ते नऊ विद्यार्थी आहेत.

पटसंख्या कमी होऊन बंद पडलेल्या शाळा इमारतीची परिस्थिती दयनीय होऊन त्यापैकी काही शाळा इमारतीची पडझड झाली आहे. मात्र, पालिका क्षेत्रातील मास्तीमळ सरकारी शाळेत सर्वाधिक 59 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे खोला येथील शाळेत 42 विद्यार्थी आहेत. काही प्राथमीक शाळातील काही वर्गात एकही विद्यार्थी नाही. विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे यापुढे सरकारी शाळातून प्राथमिक शिक्षकांच्या जागा तयार होतील ही आशा फोल ठरणार आहे.

दुसऱ्या बाजूला खाजगी अनुदानित प्राथमिक शाळाची संख्या वाढत आहे. मराठी आणि कोकणी प्राथमिक शाळांना मान्यता घेऊन प्रत्यक्षात पालकाच्या आग्रहास्तव इंग्रजीचा हट्टाहास धरण्यात येत आहे.

पंचायत शाळा संख्या विद्यार्थी संख्या
लोलये सात 44
पैगीण बारा 129
गावडोंगरी नऊ 169
खोतीगाव सात 149
श्रीस्थळ आठ 148
आगोद चार 63
खोला अकरा 158
पालिका क्षेत्र आठ 192

Web Title: In Kanakona teachers are more than students