CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर कंगना भडकली, म्हणाली...

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

'देशातील तीन ते चार टक्के लोक कर भरतात आणि यावरच बाकीचे सारे अवलंबून आहेत. त्यामुळे बसेस आणि रेल्वेची जाळपोळ करून देशातील अशांतता माजवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्न नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांना अभिनेत्री कंगना रणावत यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होत असतानाच बॉलिवूड कलाकारही यावर भाष्य करताना दिसत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणावत हिनेही सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानाविरोधात भाष्य केले आहे. 

'देशातील तीन ते चार टक्के लोक कर भरतात आणि यावरच बाकीचे सारे अवलंबून आहेत. त्यामुळे बसेस आणि रेल्वेची जाळपोळ करून देशातील अशांतता माजवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्न नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांना अभिनेत्री कंगना रणावत यांनी विचारला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवर सत्ता मिळवल्यानंतर त्याची पूर्तता सत्ताधारी करत असतील, तर ती लोकशाही नाही का, असाही प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे.

पंगा चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना कंगना बोलत होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर अभिनेत्री कंगना रानावत चांगलीच भडकली आहे.

विद्यार्थी आंदोलनावरून पुलकित भडकला; निर्मात्याला म्हणाला 'पुन्हा भेटूही नका'

कंगना म्हणाली, की मुळातच हिंसक आंदोलन करायला नको आहे. आपल्या लोकसंख्येपैकी फक्त तीन ते चार टक्केच कर भरतात. त्यामुळे बाकीचे सारे त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे बसेस आणि रेल्वेची जाळपोळ करून गोंधळ घालण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एका बसची किंमत साधारणतः 70 ते 80 लाख रुपयांची असते. ही काही छोटी रक्कम नाही. देशाची आजची अवस्था बघितली, तर भूखबळी जाताहेत. कुपोषणला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत हिंसक आंदोलन करण्याचा काय अधिकार?

जावेद जाफरी CAA वरुन झाला ट्रोल, कंटाळून सोडलं ट्विटर !

अजूनही आपण स्वातंत्र्यपूर्व काळात असल्याचे वाटते, असे सांगताना कंगना म्हणाली, की स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय सत्तेविरुद्ध आंदोलन करणे, कर न भरणे चालायचे. परंतु आज लोकशाहीमध्ये आपले नेते काही जपान, इटलीहून आलेले नाहीत. ते आपल्यातीलच आहेत.

कंगनाने आंदोलकांविरोधात भूमिका घेतल्याने तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही कंगनावर जोरदार तोफ डागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut gets angry on violence on CAA protest in Panga Promotion