दहा वर्षाच्या चिमुरडीवर घरातल्या नोकरानेच केला बलात्कार; गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

दहा वर्षाच्या चिमुरडीवर घरातल्या नोकरानेच केला बलात्कार; गंभीर जखमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये एका 10 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. घरातल्या नोकरानेच केलेल्या या बलात्कारामध्ये ही लहानगी गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

तिला सध्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील बालरोग शस्त्रक्रिया विभागामध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की, या चिमुरडीच्या जननेंद्रियासह योनीमार्ग आणि गुदद्वाराचा भाग या हल्ल्यामध्ये गंभीर रित्या जखमी झाला आहे. रविवारी रात्री सादतगंज भागामध्ये ही क्रूर घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना घडताना मुलीची आई स्वयंपाकघरात होती. जेंव्हा तीला किंचाळतानाचा आवाज ऐकू आला तेंव्हा ती बेडरुमच्या दिशेने धावली. त्याठिकाणी तिला त्यांचा घरातला नोकर सनी हा आक्षेपार्ह स्थितीत आढळला. तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

हेही वाचा: Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

सादगंजचे पोलिस अधिकारी ब्रिजेश कुमार यादव यांनी सांगितलंय की, नातेवाईकांच्या तक्रारीनुसार, आरोपीला सोमवारी बलात्काराच्या तसेच लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पॉस्को कायद्यातंर्गत अटक करण्यात आली आहे.

बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. जे डी रावत यांनी म्हटलंय की, या घटनेमुळे मुलीच्या जननेंद्रियासह योनीमार्ग आणि गुदद्वाराचा भाग या हल्ल्यामध्ये गंभीर रित्या जखमी झाला आहे. ती सध्या गंभीर आणि अत्यावस्थ आहे. लघवी करताना तिला वेदना होत आहेत, त्यासाठी तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

loading image
go to top