
जर लोक शिकली, तर त्यांना मुर्ख कसे बनवणार नरेंद्र भाई ! - कन्हैय्या कुमार
नवी दिल्ली : काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार हे नेहमी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका-टिप्पणी करित असतात. आज मंगळवारी (ता.आठ) कन्हैय्या कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, देशात टॅक्सच्या पैशातून शिकावे तरी अडचण, विदेशात स्वतःच्या पैशाने शिकावे तरी अडचण, खरे पाहता यांना शिक्षणापासूनच अडचण होतोय. जर लोक शिकली, तर त्यांना कसे मुर्ख बनवणार नरेंद्र भाई !, असा टोला कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. (Kanhaiya Kumar Criticize Narendra Modi Over Education Politics)
हेही वाचा: भाजप हा दंगाबाज आणि भ्रष्ट पक्ष, ममता बॅनर्जी यांची टीका
भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी 'ढ' असलेले विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेल्याची टीका केली होती. त्यावर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला होता. मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या २० भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य काय आहे? रशिया-युक्रेन युद्ध किती दिवस चालणार आहे? जर हे युद्ध थांबले तर पुढे या विद्यार्थ्यांना आपले वैद्यकीय शिक्षण कसे पूर्ण करता येईल असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Web Title: Kanhaiya Kumar Criticize Narendra Modi Over Education Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..