
दुरुस्तीसाठी शनिवारी हरीमपूर जिल्ह्यातला यमुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल बंद केल्यानंतर अर्ध्या तासाने पुलावरून भाजप आमदाराची कार गेली. पण त्याच पुलावरून साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला परवानगी दिली गेली नाही. आमदारासाठी वेगळा नियम आणि सामान्यांसाठी वेगळा नियम यावरून आता उत्तर प्रदेशात भाजपवर टीका केली जात आहे. रुग्णवाहिकेला परवानगी न दिल्यानं मुलानं आईचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून पूल पार केला.