esakal | ते पोलिस ओरडून सांगत होते, आम्हाला जीवे मारुन तुम्ही वाचणार नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Kanpur, Kanpur Case, Kanpur Firing

कानपूरमध्ये घटनेत विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारावेळी पोलिस शिपाई आपला जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी असलेल्या घरातील एका शौचालयामध्ये आडोशाला लपले होते.

ते पोलिस ओरडून सांगत होते, आम्हाला जीवे मारुन तुम्ही वाचणार नाही!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कानपूरमधील बिकरु गावात कुख्यात गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर बेछूड गोळीबार झाला. यात अधिकाऱ्यासह 8 पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या कारवाईची भनग लागल्यानंतर पूर्ण तयारीनिशी घरात लपलेल्या गुंडांनी पोलिसांवर घराच्या छतावरुन गोळीबार केला. यावेळी पोलिस पथकाकडून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिस त्यांना ओरडून ओरडून गोळीबार रोखण्यास सांगत होते. आम्हाला मारुन तुमची सुटका होणार नाही, अशा सूचना पोलिसांनी या गुड टोळक्याला दिल्या होत्या. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत खात्मा झालेल्या गुंडाच्या सुनेनं सांगितल आहे. विकास दुबे याने यापूर्वीही पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या होत्या. कानपूर  प्रकरणानंतर विकास दुबेच्या आईनेही त्याला दिसता क्षणी संपवा, अशी प्रतिक्रिया दिली होती. याप्रकरणात पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

'राजकारणानं उद्धवस्त केलं, त्याला मारून टाका'; विकास दुबेच्या आईची भावना

कानपूरमध्ये घडलेल्या घटनेत विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारावेळी पोलिस शिपाई आपला जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी असलेल्या घरातील एका शौचालयामध्ये आडोशाला लपले होते. गुंडांनी छतावरुन उतरुन त्यांना घेराव घातला. पोलिसांसोबतच्या चकमकीत खात्मा करण्यात आलेल्या प्रकाश पांड्येची सून सुषमा उर्फ पिंकी पांडे यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, गुंडांनी घेराव घातल्यानंतर पोलिस शिपाई त्यांना ओरडून ओरडून जीवे मारु नका, असे सांगत होते. आम्हाला मारुन तुम्ही वाचणार नाही, अशा शब्दात घेराव घातलेल्या पोलिस शिपायांनी गुंडांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही गोळ्यांची बरसात झाली अन् तो आवाज बंद झाला. विकास दुबे आणि पोलिस यांच्यातील चकमकीचा हा पहिला प्रकार नाही. यापूर्वी कल्याणपूरमध्ये तत्कालीन पोलिस निरीक्षक हमोहन सिंहने विकास दुबेला चौकात रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी विकास दुबेने गाडीतून बंदूक काढून त्यांच्यावर गोळीबार केला होता. यावेळी त्याला अटकही झाली होती.

विकास दुबेनं तुरुंगात असताना जिंकली होती निवडणूक, आता पोलिसांवर केला मोठा हल्ला

विकास दुबेकडे अत्याधुनिक हत्यारे आहेत. स्वत:ची रायफल आणि पिस्तूलशिवाय त्याने हत्यारांची तस्करी करणाऱ्यांकडून  सेमी ऑटोमेटिक रायफल्सची खरेदीही केली आहे. बिहारमधील मोठ्या तस्करांच्या तो संपर्कात आहे. त्याच्याकडे हत्याराची निर्मीती करणारी अशी काही लोक आहेत जी कारखान्यात तयार होणाऱ्या हत्यारे हुबेहुब तयार करतात.