

Kanpur Lucknow Expressway Damage
Esakal
कानपूर लखनऊ एक्सप्रेसवेच्या कामाच्या दर्जावरून आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा व्हिडीओ पोस्ट करत भाजप सरकारवर टीका केलीय. अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या रस्त्याची इतक्यात दुरुस्ती करण्याची वेळ का आली असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला. इतकंच नाही तर दुरुस्तीवेळी रस्ता सुकवण्यासाठी पंखे लावल्याच्या मुद्द्यावरूनही बांधकाम कंपनीवर निशाणा साधला.