

Kanpur OEF Army Boots
esakal
देशाच्या सीमांवर प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांसाठी कानपूरच्या ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरीने (OEF) तीन अत्याधुनिक प्रकारचे बूट विकसित केले आहेत. जवानांची सुरक्षितता, आराम आणि खडतर भूभागावर मजबूत पकड लक्षात घेऊन या बुटांची रचना करण्यात आली आहे.
या तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी ५ हजार जोड्या, म्हणजेच एकूण १५ हजार जोड्या लष्कराकडे फील्ड ट्रायलसाठी पाठवण्यात आल्या आहेत. चाचणी यशस्वी झाल्यानंतर अंतिम ऑर्डर मिळताच त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची तयारी OEFने केली आहे.