Kanpur Viral Video
esakal
Kanpur Viral Video : उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यातील रसूलाबाद परिसरातील उसरी गावातून समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एका महिलेसोबत अमानुष वर्तन करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.