Atal Bihari Vajpayee: मला पुन्हा एकदा त्यांना भाषण करताना बघायचंय...

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

वाजपेयी यांची भाच्ची कांती मिश्रा यांना माध्यमांशी बोलताना अटलजींच्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले. 'मी देवाकडे प्रार्थना करते की, मला पुन्हा एकदा त्यांना भाषण करताना बघायचं आहे. आमच्या कुटूंबियांच्या मनातून त्यांची प्रतिमा कधीच पुसली जाणार नाही. मला खात्री आहे ते लवकर बरे होतील.' अशी भावना कांती यांनी व्यक्त केली. 

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना 9 आठवड्यांपासून दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल (ता. 15) त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या दिल्ली व आग्रा येथील परिवारातील सदस्यांना एम्समध्ये बोलावून घेण्यात आले. 

वाजपेयी यांची भाच्ची कांती मिश्रा यांना माध्यमांशी बोलताना अटलजींच्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले. 'मी देवाकडे प्रार्थना करते की, मला पुन्हा एकदा त्यांना भाषण करताना बघायचं आहे. आमच्या कुटूंबियांच्या मनातून त्यांची प्रतिमा कधीच पुसली जाणार नाही. मला खात्री आहे ते लवकर बरे होतील.' अशी भावना कांती यांनी व्यक्त केली. 

थोड्या वेळापूर्वी जाहीर झालेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मागच्या 24 तासात त्यांची तब्येत जास्त खालावली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह व भाजपच्या दिग्गज नेत्यांनी वाजपेयींची भेट घेतली. 

Web Title: kanti mishra said i want to see him speech again about atal bihari vajpayee