

Kapi Yojna
esakal
उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये माकडांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अन्नाच्या शोधात माकडे मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने हल्ल्यांच्या घटनाही वाढत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून वन विभागाने 'कपि वन' ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
वन विभागाच्या मते, शहरांच्या आसपास फळझाडांची संख्या कमी झाल्याने माकडांना अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे वळावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शहरे आणि गावांच्या बाहेरील भागात माकडांसाठी स्वतंत्र फळबागा विकसित केल्या जाणार आहेत.