Kapil Dev says Gen Z youngsters are not always right
esakal
Kapil Dev urges young protesters to listen and be responsible: भारताच्या १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी देशातील तरुणांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. "तरुणांनी ऐकायला आणि अधिक जबाबदार बनायला शिकले पाहिजे. ते देशाचे भविष्य आहेत आणि आपण त्यांना चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ शकत नाही. ते नेहमीच बरोबर नसतात आणि आमच्याकडे अनुभव आहे, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे," असे कपिल टाइम्स नाऊच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.