Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Kapil Dev urges action for stray dog protection: सर्वोच्च न्यायालयाच्याया आदेशामुळे प्राणी हक्क कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Cricket legend Kapil Dev appeals to authorities for stronger protection measures for stray dogs, highlighting the importance of animal welfare.
Cricket legend Kapil Dev appeals to authorities for stronger protection measures for stray dogs, highlighting the importance of animal welfare.esakal
Updated on

Kapil Dev Advocates for Stray Dog Protection: सर्वोच्च न्यायालयाने अशातच दिल्ली आणि एनसीआर मधील रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आणि त्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआर प्रशासनास आदेश दिले होते की, भटक्या कुत्र्यांना पुन्हा सार्वजनिक ठिकाणी सोडले जावू नये. आता याप्रकरणात टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी उडी घेतली आहे. भटक्या कुत्र्यांशी निपटण्यासाठी संवेदनशील आणि मानवीय पर्यायाचा अवलंब करावा असे आवाहन कपिल देव यांनी केले आहे.

कपिल देव यांच्या मते,  प्राणी देखील प्रेमास पात्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्याया आदेशामुळे प्राणी हक्क कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे शेल्टर होम्समध्ये कुत्र्यांची संख्या वाढेल आणि मग त्यांची योग्य काळजी घेतली जाणार नाही. प्राणी कल्याणकारी संस्था पेटफॅमिलीयासाठी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात कपिल देव यांनी अधिकाऱ्यांना भटक्या कुत्र्यांचे संरक्षण करण्याचे भावनिक आवाहन केले.

कपिल देव यांनी म्हटले आहे की, मला माहीत आहे की कुत्र्यांबाबत खूप काही बोललं जात आहे. परंतु एक नागरीक म्हणून मी असं मानतो की, ते खूप सुंदर प्राणी आहेत. यामुळेच मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की, त्यांची काळजी घ्यावी. त्यांना चांगले आयुष्य द्यावे आणि त्यांना बाहेर फेकू नये. कपिल देव प्रदीर्घ काळापासून भटक्या कुत्र्यांच्या हक्कासाठी आवाज उठत आहेत.

Cricket legend Kapil Dev appeals to authorities for stronger protection measures for stray dogs, highlighting the importance of animal welfare.
2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

वर्ष २०२३मध्ये कपिल देव यांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींना आव्हान दिले, ज्यामुळे भटक्या कुत्र्यांना नष्ट करण्याची परवानगी मिळत होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये, दिल्लीत एका कुत्र्याला मारलं गेलं होतं, ज्यामुळे त्यांना हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यासही प्रेरित केलं गेलं होतं.

Cricket legend Kapil Dev appeals to authorities for stronger protection measures for stray dogs, highlighting the importance of animal welfare.
Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

कपिल देव यांच्यासाठी, हा मुद्दा केवळ धोरणाचा नाही तर नैतिक जबाबदारीचा देखील आहे. कपिल देव म्हणतात की सुरक्षित निवारा गृहे, चांगल्या पशुवैद्यकीय सुविधा आणि दीर्घकालीन देखभाल धोरणे बनवली पाहिजेत. जेणेकरून लोकांची सुरक्षितता देखील राखली जाईल आणि प्राण्यांचे अस्तित्वही धोक्यात येऊ नये. कपिल देव यांच्यासारखे अन्य पाळीव प्राणी प्रेमी न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने आता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाकडे पाठवले आहे, जे संपूर्ण प्रकरणावर मोठा निर्णय घेणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com