शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्याचा सकाळी भाजप प्रवेश, संध्याकाळी हकालपट्टी

टीम ई सकाळ
Wednesday, 30 December 2020

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या शाहीन बाग आंदोलनावेळी गोळीबार झाला होता. शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र सायंकाळी त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या शाहीन बाग आंदोलनावेळी गोळीबार झाला होता. शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र सायंकाळी त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं. सोशल मीडिया आणि टीव्हीवर कपिल गुर्जरविरोधातील वातावरणामुळे भाजपने सायंकाळी त्याची हकालपट्टी करण्यात आली. भाजपने गुर्जरचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे. 

गाझियाबादचे भाजप अध्यक्षांच्या उपस्थितीत कपिल गुर्जरसह अनेक लोकांना पक्षात घेतलं होतं. पक्षात प्रवेश केल्यानंतर कपिल गुर्जरने म्हटलं होतं की, भाजप हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष असून यासाठी पक्षात प्रवेश करत आहे. त्याचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. 

कपिल गुर्जने भाजप जॉइन केल्यानंतर टीव्ही आणि सोशल मीडियावर त्याविरोधात वातावरण निर्माण झालं. लोकांनी भाजप नेत्यांना ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करून प्रश्न विचारले. यानंतर सायंकाळी ज्यांनी गुर्जरला पक्षात सहभागी करून घेतलं होतं त्यांनीच बाहेर काढलं. भाजपचे शहराध्यक्ष संजीव शर्मा यांनी सांगितलं की, कपिल गुर्जरने शाहीनबागमध्ये गोळी चालवल्याचं माहिती नव्हतं. याबाबत समजताच गुर्जरचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं. 

कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणं पडलं महागात; आयसीयूत व्हावं लागलं दाखल

हे वाचा - बिहारमध्ये राजकीय भूकंप? RJD नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या गुर्जरला पक्षातून काढण्याची कारवाई ही केंद्रातील भाजप नेतृत्वाने फटकारल्यानंतर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव यांनी ट्विट करून म्हटलं की, गाझियाबादच्या कपिल गुर्जरची विचारसरणी भाजपमध्ये बसणारी नाही. कपिल गुर्जरचे सदस्यत्व भाजपकडून रद्द करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil-gurjar-who-fires shaheen bagh joined bjp in-morning party take action evening