बिहारमध्ये राजकीय भूकंप? RJD नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 December 2020

राष्ट्रीय जनता दलाचे नेता श्याम रजक यांनी बिहार राजकीय परिस्थितीविषयी मोठा दावा केला आहे

पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे नेता श्याम रजक यांनी बिहार राजकीय परिस्थितीविषयी मोठा दावा केला आहे. श्याम रजक म्हणालेत की, जेडीयूचे आमदार भाजपच्या कार्यशैलीमुळे नाराज आहेत आणि ते बिहारमधील एनडीए सरकार पाडू पाहात आहेत. ते पुढे म्हणाले की,जेडीयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच आरजेडीमध्ये सामिल होतील. श्याम रजक यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

कमाल झाली! चॉकलेट ठिक आहे पण बिअरही जीवनावश्यक!

आरजेडीचे नेता आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी दावा केलाय की जनता दल यूनायटेडचे 17 आमदार त्यांच्या माध्यमातून आरजेडीच्या संपर्कात आहेत. तसेच ते लवकरात लवकर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षामध्ये सामिल होऊ इच्छित आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या प्रकारे जेडीयू नेत्यांना भाजपमध्ये सामिल करुन घेण्यात आलं, त्यामुळे आमदार नाराज आहेत. 

भाजपवर नाराज आहेत JDU आमदार

जेडीयू आमदार भाजपच्या कारभारामुळे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे ते एनडीए सरकारमध्ये राहू इच्छित नाहीत. त्यांना आरजेडीमध्ये यायचं आहे. सध्या या आमदारांना थांबण्यास सांगण्यात आलं आहे, श्याम रजक म्हणाले की, 17 आमदार आरजेडीमध्ये सामिल झाले तर पक्ष-बदल कायद्याअंतर्गत त्यांची सदस्यता रद्द होऊ शकते. तसेच 25 ते 26 आमदारांनी पक्ष सोडला, तर त्यांची सदस्यता रद्द होणार नाही, असंही ते म्हणाले. 

जनला जल यूनायटेडने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. प्रवक्ता राजीन रंजन म्हणाले की, आरजेडी नेते आपल्या वक्तव्याने लोकांची दिशाभूल करत आहेत. असे असले तरी आमदार त्यांच्या जाळ्यात सापडणार नाहीत. जेडीयू एकजूट असून भाजपसोबत 5 वर्ष पूर्ण करेल. 

कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणं पडलं महागात; आयसीयूत व्हावं लागलं दाखल

बिहारमध्ये काय आहे आकड्य़ांचा खेळ

243 सदस्य संख्या असणाऱ्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू-भाजपला 125 आणि आरजेडी आघाडीला 110 जागा मिळाल्या. भाजपला 74, जेडीयूला 43 जागा मिळाल्या. नितीश कुमार यांचं सरकार बहुमताच्या काटावर आहे. त्यामुळे जर जेडीयूच्या काही आमदारांनी पक्ष सोडला तर नितीश कुमारांचं सरकार संकटात सापडू शकतं. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitish kumar government in danger 17 jdu mla want to join rjd