Kapil Sibal : "भाजप विरोधात जिंकायचे असेल तर..." ; कपिल सिब्बलांनी आखला प्लॅन!

Kapil Sibal
Kapil Sibal

लोकसभा निवडणुकीबाबत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भाजपच्या विरोधात पुढील निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने इतर राजकीय पक्षांसोबत आघाडी केली पाहिजे, असे कपिल सिब्बल म्हणाले.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी मजबूत आघाडी हवी. जी भाजपचा सामना करु शकेल. मजबूत आघाडी करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकमेकांच्या विचारसरणीवर टीका करताना संवेदनशील राहावे लागेल. तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना प्रथम एक समान व्यासपीठ शोधण्याचे आवाहन देखील सिब्बल यांनी केले आहे.

सिब्बल म्हणाले, हे व्यासपीठ 'इन्साफ के सिपाही' वेबसाइटही असू शकते. केंद्र सरकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे व्यासपीठ असेल.

२०२४ च्या विरोधी आघाडीच्या नेतृत्वाबाबत प्रश्नाचे या टप्प्यावर उत्तर देण्याची गरज देखील नाही. यावेळी सिब्बल यांनी २००४ मधील एक उदाहरण देखील दिले आहे. जेव्हा विरोधकांचा पंतप्रधान चेहरा ठरवला जात नसतानाही लोकसभा निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेतून बाहेर पडले होते.

Kapil Sibal
PM मोदींच्या जंगलसफारीचा स्वॅग पाहून इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू गेला भारावून

शरद पवारांच्या वक्तव्यावर सिब्बल काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही कपिल सिब्बल यांनी वक्तव्य केले आहे. भारतातील क्रोनी कॅपिटलिझमबद्दल राहुल गांधींची काही दृष्टी असेल तर मला वाटते शरद पवार सुद्धा क्रॉनी कॅपिटलिझमशी संबंधित व्यासपीठाच्या विरोधात नसतील.

शरद पवार यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळे विचार ठेवायला हवे. तसेच राहुल गांधी यांना कोणत्याही एका व्यक्तीबद्दल त्यांचे मत मांडण्याची मुभा असावी. शरद पवार यांनाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. याकडे विसंवादाचे उदाहरण म्हणून पाहिले जाऊ नये.

Kapil Sibal
"बावनकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात…हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का?"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com