India Alliance : राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी 'इंडिया' आघाडीला एकजूट दाखवण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे. विरोधक आघाडीची अधिकृत रचना असावी, असा त्यांचा आग्रह आहे.
नवी दिल्ली : ‘‘इंडिया आघाडीने ‘आघाडी’सारखे दिसले पाहिजे त्यात बिघाडी दिसता कामा नये,’’ असे मत राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले.