दीपिका-रणवीरवर ड्रग्ज सेवन केल्याचा आमदाराचा आरोप; देवरांनी दिले स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

पार्टीमध्ये सेलिब्रिटींनी अमली पदार्थांचं सेवन केल्याचं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. यामध्ये आता राजकीय पक्षांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे. या पार्टीमधील एक व्हिडिओ अकाली दलाचे नेते मजिंदर सिरसा यांनी शेअर केला आहे.

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने काही दिवसापूर्वी कलाविश्वातील सेलिब्रिटींसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. करणने दिलेल्या या पार्टीची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली. या पार्टीमध्ये सेलिब्रिटींनी अमली पदार्थांचं सेवन केल्याचं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. यामध्ये आता राजकीय पक्षांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे. या पार्टीमधील एक व्हिडिओ अकाली दलाचे नेते मजिंदर सिरसा यांनी शेअर केला आहे.
 

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीकास्त्रही सोडलं आहे. मात्र त्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते मलिंद देवरा यांनी पार्टीमधील सत्य परिस्थिती सांगितली आहे.

हे आहे फिक्शन वर्सेस रिअॅलिटी पाहा बॉलिवूड कलाकार असे गर्वाने अमली पदार्थांचं सेवन केल्याचं दाखवत आहेत. अशाप्रकारे अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांचा मी विरोध करतो. तुमचाही याला विरोध असेल, तर रिट्विट करा,अशा आशयाचं ट्विट मंजिदर यांनी केलं होतं. सोबतच त्यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांना टॅगही केलं होतं. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी ते रिट्विट करत उत्तर दिलं आहे.

देवरांनी म्हटलं आहे की, माझी पत्नीदेखील त्या पार्टीमध्ये उपस्थिती होती आणि या व्हिडीओमध्येदेखील ती दिसून येत आहे. या पार्टीमध्ये कोणत्याही कलाकाराने अमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं. त्यामुळे उगाच अफवा पसरवणं बंद करा. मी आशा करतो की याप्रकरणी तुम्ही माफी मागण्याचं धाडस कराल, असं उत्तर मिलिंद देवरा यांनी दिलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karan House Party Alleges Akali Dal Leader Gets Slammed Milind Deora Tweet