esakal | विधान परिषदेत पॉर्न पाहणाऱ्या काँग्रेस आमदाराचा व्हिडिओ व्हायरल, भाजपची राजीनाम्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

smartphone main.jpg

फोनमध्ये स्टोरेज क्षमता कमी झाल्यामुळे फाइल डाऊनलोड होत नव्हती. त्यामुळे काही डेटा डिलीट करत होतो.

विधान परिषदेत पॉर्न पाहणाऱ्या काँग्रेस आमदाराचा व्हिडिओ व्हायरल, भाजपची राजीनाम्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

बंगळुरु- कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा पॉर्नगेट प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसच्या आमदारावर विधान परिषदेत बसून आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकाश राठोड असे या आमदारांचे नाव असून भाजप याप्रकरणी आक्रमक झाली असून त्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. 

कन्नड भाषेतील काही वृत्त वाहिन्यांनी दावा केला आहे की, काँग्रेस आमदार प्रकाश राठोड शुक्रवारी विधान परिषदेचे कामकाज सुरु असताना आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहत होते. व्हिडिओमध्ये राठोड हे आपल्या मोबाइल फोनमधील स्टोरेज साफ करत असतानाच त्यांच्या फोनमध्ये अश्लील व्हिडिओही असल्याचे दिसत आहे. परंतु, त्यांनी व्हिडिओ क्लिक केला नाही. ते स्क्रोल करत पुढे गेल्याचे दिसले. 

हेही वाचा- फक्कड बाबांनी राम मंदिरासाठी दिले १ कोटी; ६० वर्षांपासून राहत आहेत गुहेत!

प्रसार माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाले की, प्रश्नोत्तराच्या कामकाजावेळी सरकारला विचारायच्या प्रश्नांसाठी मोबाइलमध्ये असलेली माहिती शोधत होतो. फोनमध्ये स्टोरेज क्षमता कमी झाल्यामुळे फाइल डाऊनलोड होत नव्हती. त्यामुळे काही डेटा डिलीट करत होतो. जेव्हा प्रश्नासंबंधित फाइल शोधत होतो. तेव्हा फोनमध्ये अनेक मेसेज होते. फोन स्टोरेजमध्ये जागा करण्यासाठी मी ते डिलीट मेसेज करत होतो. जे तुम्ही (माध्यमं) पाहिलं किंवा दाखवलं त्याबाबत मला माहीत नाही. मी कधीच अशा गोष्टी करणार नाही आणि पाहिलेलं ही नाही, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

हेही वाचा- इंदूर एअरपोर्टवर आली राहुल गांधींची फिऑन्से; म्हणाली लग्न झाल्यावर कराल सलाम

परंतु, भाजपने याप्रकरणी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने राठोड यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. भाजप प्रवक्ते एस प्रकाश म्हणाले की, काँग्रेस आमदार राठोड यांच्या निलंबनाची मागणी आम्ही करतोय. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हा मुद्दा आम्ही विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित करणार आहोत. त्यांच्या या कृत्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.