इंदूर एअरपोर्टवर आली राहुल गांधींची फिऑन्से; म्हणाली लग्न झाल्यावर कराल सलाम

rahul gandhi
rahul gandhi

इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये देवी अहिल्यादेवी होळकर एअरपोर्टवर गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेने जोरदार गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार, तिथे एक महिला हलकल्लोळ माजवत मेन गेटपर्यंत पोहोचली. ती आत जाण्यासाठी हट्ट करत होती. तिच्या जवळ चार-पाच बॅग होत्या. मात्र तिकीट नव्हतं आणि तिला कुठे जायचं देखील नव्हतं. या महिलेचं म्हणणं मात्र अगदी विचित्र होतं. ते ऐकन कुणाच्याही भुवया उंचावल्या असत्या. त्या महिलेचं म्हणणं होतं की तिला राहुल गांधींशी लग्न करण्यासाठी दिल्लीला जायचं आहे. राहुल गांधी तिला भेटायला येत नाहीत म्हणून तिच त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी लग्न करण्यासाठी जात आहे. आणि लग्न झाल्यावर तुम्हीच मला सॅल्यूट कराल, असं तिने म्हटलं आहे. 

मानसिक दृष्ट्या आहे आजारी
या महिलेला वारंवार समजावून देखील ती ऐकत नव्हती. सरतेशेवटी सुरक्षारक्षकांनी पोलिसांना बोलवून घेतलं. पोलिसांनी तिला समजावल्यानंतर ती आपल्या घरी परतण्यास तयार झाली. पोलिसांनी या महिलेच्या नातेवाईकांची माहिती मिळवली. तपासात माहिती मिळाली की ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तसेच ती कायम घराबाहेर पडते आणि याप्रकारे वेडसर दावे करते. 

मी राहुलची बायको बणेन
या महिलेचं राहुल गांधीसोबत लग्न होणार आहे, हे ऐकून एअरपोर्टवरील उपस्थित लोक अचंबित झाले. तिने सुरक्षारक्षकांना म्हटलं की, लवकरच ती राहुल गांधी यांची पत्नी बनणार आहे. आणि त्यानंतर मग सगळे तिला सॅल्यूट ठोकतील. या महिलेने पुढे असंही म्हटलं की, राहुल तिला भेटायला येत नाहीत. म्हणून तिच त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी दिल्लीला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com