esakal | फक्कड बाबांनी राम मंदिरासाठी दिले १ कोटी; ६० वर्षांपासून राहत आहेत गुहेत!
sakal

बोलून बातमी शोधा

Swami_Shankar_Das

राम मंदिरासाठी ही देणगी गुप्तदान स्वरुपात देण्याची फक्कड बाबांची इच्छा होती.

फक्कड बाबांनी राम मंदिरासाठी दिले १ कोटी; ६० वर्षांपासून राहत आहेत गुहेत!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त देणगी देण्यासाठी पुढे येत आहेत. राम मंदिराशी लोकांची एवढी नाळ जोडली गेली आहे की ते आपली संपूर्ण संपत्ती देण्यासाठी तयार आहेत. असंच काहीसं ऋषिकेशमध्ये दिसून आलं. स्वामी शंकर दास (Swami Shankar Das) यांनी राम मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपये देणगी दिली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या ६० वर्षांपासून गुहेत स्वामी शंकर दास आपलं जीवन व्यतीत करत आहेत. स्वामी शंकर दास यांना लोक फक्कड बाबा म्हणून ओळखतात. फक्कड बाबा गुरुवारी ऋषिकेशमधील स्टेट बँकेच्या शाखेत पोहोचले आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी तब्बल १ कोटी रुपयांचा चेक बँक कर्मचाऱ्यांकडे दिला. 

Budget 2021: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी गोंधळ; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खासदारांच्या घोषणा​

फक्कड बाबांनी आपल्याकडे एक कोटी रुपयांचा चेक दिला आहे, याच्यावर बँकेतील कर्मचाऱ्यांचा विश्वास बसला नाही. या प्रकरणी बँक कर्मचाऱ्यांनी ८३ वर्षीय स्वामी शंकर दास यांच्या खात्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या खात्यात एक कोटींहून अधिक पैसे जमा असल्याची खात्री बँक कर्मचाऱ्यांना पटली. फक्कड बाबांनी आपली आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान केली. आज माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं अशी भावना फक्कड बाबांनी यावेळी व्यक्त केली. 

दिल्ली सीमेवर स्थानिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज​

कोण आहेत फक्कड बाबा
दरम्यान, टाटवाले बाबा यांचे शिष्य म्हणून फक्कड बाबांनी गुहेमध्ये आयुष्य व्यतीत केले. टाटवाले बाबांना दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून जे दान मिळायचं ते सर्व पैसे फक्कड बाबांनी बँकेत जमा केले. आणि आता ती रक्कम राम मंदिरासाठी दान स्वरुपात दिली आहे. स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ऋषिकेशमधील आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना फक्कड बाबांनी दिलेल्या देणगीसंदर्भात माहिती कळवली. ऋषिकेशचे नगर कार्यवाह कृष्ण कुमार सिंघल यांनी बाबांकडून चेक घेऊन तो राम मंदिराच्या खात्यावर जमा केला.  

इंदूर एअरपोर्टवर आली राहुल गांधींची फिऑन्से; म्हणाली लग्न झाल्यावर कराल सलाम​

गुप्त दान म्हणून देणार होते देणगी
राम मंदिरासाठी ही देणगी गुप्तदान स्वरुपात देण्याची फक्कड बाबांची इच्छा होती. पण आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर त्यांनी चेक देत एक फोटोही काढला.

ऋषिकेश ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथे सर्व प्रकारचे संत पाहायला मिळतात. येथील जंगल आणि गुहेत अनेक साधु-संत कित्येक वर्षांपासून तपस्येत लीन असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे या तपोभूमीला ऋषिकेश हे नाव पडले आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image