Kargil Vijay Diwas: युद्धावेळी चक्क पंतप्रधान वाजपेयी ३ दिवस रणांगणात तळ ठोकून होते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kargil Vijay Diwas

Kargil Vijay Diwas: युद्धावेळी चक्क पंतप्रधान वाजपेयी ३ दिवस रणांगणात तळ ठोकून होते

१९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिलमध्ये युद्ध सुरू होते. त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांना हे युद्ध कोणत्याही किंमतीवर जिंकायचे होते. जसजसे युद्ध पुढे सरकत गेले, तसतसे अटल बिहारी बाजपेयी यांना कळत होते की हे युद्ध पूर्वी झालेल्या युद्धा इतके सोपे नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः मैदान-ए-जंग येथे जाऊन सैनिकांना प्रोत्साहन दिले होते.

युद्धादरम्यान अटलजी कारगिलला पोहोचले आणि तेथे ते तब्बल तीन दिवस राहिले. त्यांनी सैनिक आणि अधिकारी यांच्याशी बातचीत करत युद्ध परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. (Kargil Vijay Diwas Former Prime Minister Atal Bihari Vajpayee stayed three days in battlefield with soldiers)

हेही वाचा: Kargil Vijay Diwas: 'जरा याद करो कुर्बानी', जाणून घ्या 'या' सहा शुरवीरांची कहानी

पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या रिकाम्या चौक्यांवर स्थायिक झाले असून ते पुढे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यावेळी भारतीय सैन्याला पाकिस्तानशी क्रॉस युद्ध करायचे होते. त्यासाठी तातडीने राजकीय मंजुरीची गरज होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गृह आणि संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीची आढावा घेतला.

हेही वाचा: Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाविषयीच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती का ?

अटल बिहारी यांच्यासोबत तत्कालीन गृह आणि संरक्षण मंत्री आणि लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्यामध्ये केवळ समोरासमोरच्या लढ्याला तात्काळ राजकीय मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. उलट या युद्धाच्या रणनीतीचाही विचार करण्यात आला. या बैठकीतच अटलबिहारी यांनी पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर लगेचच पंतप्रधानांकडून युद्धाला राजकीय मंजुरी देण्यात आली आणि लष्करांसाठी मार्ग मोकळा केला.

हेही वाचा: Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे ?

लढाईचे मैदान नसल्यामुळे सैन्याना शत्रू डोळ्याने दिसत नव्हता. शत्रुला आधी शोधायचे आणि नंतर त्याचा नायनाट करायचा. हे युद्ध जिंकण्यासाठी किती वेळ लागेल हे कोणालाच माहीत नव्हते. परंतु तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी, इतर मंत्री आणि लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांनी ठरवले की बर्फ वितळताच भारतीय सैन्य कारगिल शिखरांवर हल्ला करेल आणि बर्फ पडण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत विजयची खात्री केली जाईल. कारगिल युद्ध मे मध्ये सुरू झाले आणि 26 जुलै रोजी ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी पार पडले म्हणजेच कारगिल युद्ध भारताने जिंकले.

Web Title: Kargil Vijay Diwas Former Prime Minister Atal Bihari Vajpayee Stayed Three Days In Battlefield With Soldiers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top