esakal | शेतकऱ्यांचे डोके फोडायला सांगणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers protest

शेतकऱ्यांचे डोके फोडायला सांगणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी

sakal_logo
By
सुधीर काकडे

हरियाणामध्ये (Haryana) सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील एक व्हिडिओ काही दिवसांपुर्वी व्हायरल झाला होता. हरियाणातील करनालचे उपजिल्हा दंडाधिकारी आयुष सिन्हा यांनी स्थानिक पोलिसांना आदेश देताना थेट शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश दिल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतरच हरियाणामध्ये शेतकाऱ्यांवर झालेल्या लाठीमारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने हा व्हिडिओतील अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर आता हरियाणा सरकारकडून आयुष सिन्हा (IAS Ayush Sinha) यांची बदली करण्यात आली आहे.

हरियाणा सरकारने बुधवारी पारित केलेल्या आदेशानुसार, सिन्हा यांची बदली करुन आता हरियाणा सरकारच्या नागरिक संसाधन माहिती विभागात (CMID) अतिरिक्त सचिव म्हणून त्यांना नियुक्त केले जाणार आहे. शनिवारी हरियाणामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान समोर आलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये सिन्हा पोलिसांच्या एका पथकाला सूचना देताना दिसले होते. ‘काहीही झाले तरी त्यांना येऊ द्यायचे नाही आणि एखादा जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं डोकं फोडा, मध्ये कोणीही आला तर त्याचं डोकं फुटलेलं दिसलं पाहिजे’ अशा सुचना यावेळी आयुष सिन्हा यांनी पोलिसांच्या पथकाला दिल्या होत्या.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सिन्हा यांच्या विवादास्पद व्हिडिओबद्दल प्रतिक्रीया देताना ‘अधिकाऱ्याने वापरलेले शब्द योग्य नसले तरी तिथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधिक ठेवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोरपणा ठेवावा लागला.' असे मत व्यक्त केले.

हेही वाचा: लाठीमारामुळे नवी ऊर्जा!

दरम्यान, हरियानातील करनाल येथे शेतकरी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. करनाल येथील आंदोलक शेतकऱ्यावर झालेला लाठीमार व ‘ या शेतकऱ्यांची टाळकीच फोडा,‘ हा आयुष सिन्हा नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा व्हायरल झालेला आदेश, यामुळे आंदोलक शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

loading image
go to top