'हा' एकमेव नेता वाचवू शकतो काँग्रेस-जेडीएसचे सरकार

'हा' एकमेव नेता वाचवू शकतो काँग्रेस-जेडीएसचे सरकार

बंगळूरु : कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारचं भवितव्य अधांतरी आहे. कारण, शनिवारी काँग्रेस-जेडीएस सरकारमधील 14 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. म्हणून काँग्रेस-जेडीएस सरकार टिकणार की जाणार? यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसच्या 11 तर जेडीएसच्या 3 आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस-जेडीएस सरकारला पडण्यापासून एकमेव नेता वाचवू शकतो तो म्हणजे रामलिंग रेड्डी. रामलिंग रेड्डी हे बंडखोर आमदारांचं नेतृत्व करत आहेत. रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यात काँग्रेस-जेडीएसला यश आल्यास काँग्रेस-जेडीएस सरकारला कोणताही धोका राहणार नाही. काँग्रेसनं आपली संपूर्ण ताकद आता रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यावर केंद्रीत केली आहे. सरकार टिकवण्यासाठी किमान 03 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकीय घडामोडी अत्यंत रंजक वळणार आहेत.

विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसकडे 78, जेडीएस 37, बसपा 1, अपक्ष 2, भाजप 105 आणि अन्य 1 अशी आकडेवारी आहे. दरम्यान, 11 आमदारांचा राजीनामा स्वीकार केल्यास सदस्यसंख्या 210 होईल. त्यामुळे बहुमताचा आकडा हा 113 ऐवजी 106 होईल. काँग्रेस-जेडीएसकडे 104 आमदार आहेत. त्यांना बहुमतासाठी 2 जागा कमी पडतील. तर, भाजपाकडे 105 जागा असल्यानं त्यांना केवळ 1 आमदाराची गरज आहे. त्यामुळे भाजपला सरकार स्थापनेची संधी या ठिकाणी सर्वाधिक आहे. पण, पुढील 3 दिवसात कर्नाटकात नेमके कोणाचे सरकार असेल हे चित्र स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com