Karnataka Election : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी उपमुख्यमंत्र्यांना मिळालं तिकीट

काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) आज तिसरी यादी जाहीर केली.
Karnataka Assembly Election
Karnataka Assembly Electionesakal
Updated on
Summary

भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक दिवस आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

बेंगळुरू : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) आज तिसरी यादी जाहीर केली. पक्षानं 43 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

या यादीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांना अथणी मतदारसंघातून, तर कोलारमधून कोथुर्जी मंजुनाथ यांना तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक दिवस आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत पक्षाचं सदस्यत्व घेतलं. भाजपनं यापूर्वी सवदी यांना अथणी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

Karnataka Assembly Election
Karnataka Election : कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपनं बनवली Super 60 टीम; 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

तिकीट कापल्यामुळं संतापलेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते अथणीचे (Athani Constituency) तीन वेळा आमदार राहिले आहेत.

Karnataka Assembly Election
Karnataka Election : राष्ट्रवादी 'घड्याळ' चिन्हावर लढवणार कर्नाटक विधानसभा निवडणूक; आयोगानं घेतला मोठा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com