Karnataka Assembly Election 2023 : सर्वेक्षणातून धक्कादायक निकाल; मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत...

मुख्यमंत्री म्हणून कोणाला सर्वाधिक पसंती?
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणाला सर्वाधिक पसंती? याबाबत जनतेचा कौल देण्यात आला आहे. (Karnataka Assembly Election 2023 Siddaramaiah Most Popular Choice For Karnataka Chief Minister )

CSDS ने NDTV यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, कर्नाटकातील पुढील मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेते सिद्धरामय्या सर्वाधिक पसंतीचे नेते आहेत. तर, विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांना दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जुन्या मतदारांमध्ये सिद्धरामय्या हे बोम्मई यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असले तरी सध्याचे मुख्यमंत्री हे नव्या मतदारांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा पुढे आहेत.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election 2023: 'या' काँग्रेस नेत्यांचा पराभव करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लान; भाजप रणनितीकारांनी लावली ताकद

सर्वेक्षणानुसार, जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तिसरे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे बीएस येडियुरप्पा आणि काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचा क्रमांक लागतो.

तर सी-व्होटरनुसार, ओपिनियन पोलमध्ये सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बसवराज बोम्मई यांच्यापेक्षा पुढे होते. या ओपिनियन पोलमध्ये 41 टक्के लोकांनी सिद्धरामय्या यांना 'मुख्यमंत्री' पसंती दिली होती. बसवराज बोम्मई यांना 31 टक्के लोकांनी पसंती दिली. 22 टक्के लोकांनी एचडी कुमारस्वामी यांच्या बाजूनं कौल दिला होता. 3 टक्के लोकांनी डीके शिवकुमार यांचं नाव घेतलं होतं.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : निवडणुकीत भाजप, काँग्रेसकडून तब्बल 335 कोटी खर्च; मोदींच्या सभांचा खर्चच यादीतून गायब

10 मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बहुतांश जनमत चाचण्या आणि सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसून आला आहे. मात्र, भाजप राज्यात पुन्हा सत्तेत येईल, असा दावा करत आहे. दुसरीकडे, काँग्रेसला या वेळी सत्तेत येण्याची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षांकडून राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे.

18 ते 25 वयोगटातील लोकांमध्ये सर्वाधिक पसंती कोणाला?

सिद्धरामय्या : 40 टक्के

बसवराज बोम्मई : 28 टक्के

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : 'या' मतदारसंघातील 35 पैकी 14 उमेदवार दहावी पास, तर चौथी शिक्षण झालेलाही उमेदवार रिंगणात

56 वर्षांवरील लोकांमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला अधिक पसंती आहे?

सिद्धरामय्या : 44 टक्के

बसवराज बोम्मई : 22 टक्के

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील इतर चेहरे कोण? अन् पसंती कोणाला?

एचडीकुमार स्वामी : 15 टक्के

बीएस येदियुरप्पा : 5 टक्के

डीके शिवकुमार : 4 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com