Amit Shah : मुस्लिमांचं आरक्षण आम्हीच संपवलं; काँग्रेस देणार असेल तर कुणाचं कमी करणार? शाहांचं ओपन चॅलेंज

Amit Shah : मुस्लिमांचं आरक्षण आम्हीच संपवलं; काँग्रेस देणार असेल तर कुणाचं कमी करणार? शाहांचं ओपन चॅलेंज
Updated on

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून १३ तारखेला मतमोजणी होईल. यावेळी भाजपला निवडणूक जड जाणार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुस्लिम आरक्षणाचा पत्ता टाकला आहे. आमच्याच सरकारने मुस्लिमांचं असंवैधानिक आरक्षण रद्द केल्याचं सांगून काँग्रेस जर मुस्लिमांना ६ टक्के आरक्षण देणार असेल तर ते कसं देणार, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. प्रचार संपायच्या आतमध्ये काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, असं ओपन चॅलेंज अमित शाह यांनी दिलं आहे.

Amit Shah : मुस्लिमांचं आरक्षण आम्हीच संपवलं; काँग्रेस देणार असेल तर कुणाचं कमी करणार? शाहांचं ओपन चॅलेंज
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक लंडन दौऱ्यावर; तर झिरवळ म्हणतात, मी आमदारांना अपात्र करेन!

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेसने मुस्लिमांचं आरक्षण वाढवून ६ टक्के करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु कुणाचं कमी करुन मुस्लिमांना देणार, हे स्पष्ट केलं नाही. ओबीसींचं आरक्षण कमी करणार की लिंगायत समाजाचं? प्रचार संपण्याच्या आधी काँग्रेसने हे स्पष्ट करावं.

मुस्लिमांना दिलेलं ४ टक्के आरक्षण आमच्या पक्षाने संपवलं, कारण ते असंवैधानिक होतं. आपल्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. काँग्रेसने तुष्टीकरणाची खेळी करुन मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं. परंतु आम्ही ते काढून टाकलं.

Amit Shah : मुस्लिमांचं आरक्षण आम्हीच संपवलं; काँग्रेस देणार असेल तर कुणाचं कमी करणार? शाहांचं ओपन चॅलेंज
Diamond Fraud: 32 लाखांच्या हिऱ्यांच्या जागी दिलं गुटख्याचं पाकीट! गुजराती व्यापाऱ्याला अटक

कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तुफान आहे. त्यामुळे भाजप बहुमताने सत्तेवर येणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com