8 आमदारांचे राजीनामे नियमात न बसणारे; कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचे वक्तव्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जुलै 2019

- विधानसभा अध्यक्ष कुमार यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकातील राजकीय नाट्याला मिळाले नवे वळण.

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे आता त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी सांगितले, की विधानसभेतील कोणताही बंडखोर आमदार मला भेटलेला नाही. 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांचे राजीनामे हे नियमांच्या चौकटीत बसणारे नाहीत. 

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसचे नेते सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे बंडखोर आमदारही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, या परिस्थितीत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकलेल्या एका डावामुळे बंडखोर आमदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. 

के. आर. रमेश कुमार यांनी सांगितले, की विधानसभेतील कोणताही बंडखोर आमदार मला भेटलेला नाही. 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांचे राजीनामे हे नियमांच्या चौकटीत बसणारे नाहीत, असे त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष कुमार यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकातील राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले असून, आमदारांच्या राजीनाम्याबाबतही संशय निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Assembly Speaker Ramesh Kumar Decision on Rebel MLA