VIDEO : शेख महाराजांनंतर प्रवचन देताना आणखी एका महाराजांना हृदयविकाराचा झटका; मृत्यूचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanganabasava Swamiji

एका संताचा कार्यक्रमादरम्यान प्रवचन देताना हृदयविकाराचा झटका येऊन मंचावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

VIDEO : शेख महाराजांनंतर प्रवचन देताना आणखी एका महाराजांना हृदयविकाराचा झटका

बंगळुरू : वारकरी संप्रदायातील ताजुद्दीन शेख (Sheikh Tajuddin Maharaj) औरंगाबाद यांचे धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) जवळील जामदा येथे किर्तन सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना ताजी असतानाच, आता कर्नाटकातील बेळगावात एका संताचा कार्यक्रमादरम्यान प्रवचन देताना हृदयविकाराचा झटका येऊन मंचावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना 6 नोव्हेंबरची आहे. मात्र, आता त्याचा व्हिडिओ समोर आला असून या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

कर्नाटकातील बेळगावात (Belgaum) संत संगणा बसव स्वामी (Sanganabasava Swamiji) आपल्या अनुयायांना संबोधित करत असताना मंचावरच अचानक बेशुद्ध झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संगना बसव स्वामी (वय 53) हे बालोबाला (ता. गोकाका) मठाचे मुख्य संत आणि बसवयोग मंडप ट्रस्टचे प्रमुख होते. 6 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि ते त्यांच्या मठात अनुयायांना संबोधित करत होते. प्रवचनादरम्यान ते अचानक कोसळले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी दु:ख व्यक्त केलंय.

हेही वाचा: 'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही'

ताजुद्दीन शेख महाराजांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

वारकरी संप्रदायातील मुस्लिम असलेले ताजुद्दीन शेख औरंगाबाद यांचं धुळे जिल्ह्यातील (ता. साक्री) निजामपूर जवळील जामदा येथे कीर्तन सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची घटना घडली होती. शिवाय, गेल्याच महिन्यात राजस्थानमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. जिथं पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्टेजवर भाषण करताना एका नेत्याचा मृत्यू झाला होता. त्या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही व्यासपीठावर उपस्थित होते. 26 ऑक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या नेत्याला भाषण करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ते मंचावरच कोसळले.

हेही वाचा: 'जय भीम' अडचणीत; चित्रपटाच्या निर्मात्यांना 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

loading image
go to top