'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही' I BSF Soldier | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamta Banerjee

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी बीएसएफ जवान सक्षम आहेत का?

'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) पुढील आठवड्यात नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊ शकतात. TMC च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्याची थकबाकी आणि बीएसएफचं वाढलेलं अधिकारक्षेत्र (BSF Jurisdiction Controversy) यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं कळतंय. तर, दुसरीकडं पश्चिम बंगाल विधानसभेत BSF च्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याविरोधात ठराव मांडण्यात आलाय. मात्र, हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी भाजपनं केलीय. विधानसभेत या प्रस्तावावर टीएमसीनं कठोर भूमिका घेतलीय.

टीएमसीचे प्रवक्ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक 2024 जवळ येत असून या 50 किमी परिघात लोकसभेच्या 22 जागा आहेत. बीएसएफच्या माध्यमातून भाजप या 22 जागांवर लक्ष ठेवून आहे. म्हणूनच, त्यांना 15 किमीची त्रिज्या 50 पर्यंत वाढवायची आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी बीएसएफ जवान सक्षम आहेत का? सिलीगुडीपासून सुंदरबनपर्यंतच्या सीमावर्ती भागात हत्या झाल्या आहेत. जोपर्यंत आमच्या शरीरात रक्त शिल्लक आहे, तोपर्यंत आम्ही बीएसएफला आमच्या भूमीत येऊ देणार नाही, असं टीएमसीनं रोखठोक सांगितलंय. बीएसएफ 50 किमी परिसरात कसा प्रवेश करते, ते आम्ही पाहूच. आमचं सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

हेही वाचा: 'दलितांच्या 10 वेळा घरी जा.. तिथं चहा प्या, जेवण करा आणि मगच मत मागा'

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्या पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ शकतात. या बैठकीत राज्याची थकबाकी आणि बीएसएफचं वाढलेलं कार्यक्षेत्र यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री 22 नोव्हेंबरला राजधानीला भेट देतील आणि 25 नोव्हेंबरला कोलकात्याला परततील. टीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री राज्याची थकबाकी भरण्याची दीर्घकाळची मागणी पूर्ण करणार आहेत. शिवाय, आंतरराष्ट्रीय सीमेपासून सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) कार्यक्षेत्र 15 किमीवरून 50 किमीपर्यंत वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयावरही त्या आक्षेप नोंदवतील, असंही समजतंय.

हेही वाचा: 'जय भीम' अडचणीत; चित्रपटाच्या निर्मात्यांना 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

loading image
go to top