सूर्याचा 'जय भीम' पुन्हा अडचणीत; चित्रपटाच्या निर्मात्यांना 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Bheem

नुकताच प्रदर्शित झालेला 'जय भीम' (Jai Bheem) हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडलाय.

'जय भीम' अडचणीत; चित्रपटाच्या निर्मात्यांना 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

नुकताच प्रदर्शित झालेला 'जय भीम' (Jai Bheem) हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडलाय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एका दृश्यावरून बराच वाद झाला होता. त्यामध्ये प्रकाश राज यांची व्यक्तिरेखा चित्रपटातील एका हिंदी भाषिक व्यक्तीला थप्पड मारताना दिसतेय. आता अशी एक बातमी समोर येत आहे, की ‘वेन्नीयार संगम’नं (Vanniyar community notice to Jai Bheem) चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस पाठवली असून 5 कोटींची भरपाईही मागितलीय. त्यामुळं अभिनेता सूर्यासह ‘जय भीम’ चित्रपटाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओला 5 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आलीय.

‘वेन्नीयार संगम’नुसार, जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी झालीय. वेन्नीयार समाजाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला कलंक लावणारी बदनामीकारक दृश्ये जाणीवपूर्वक चित्रपटात टाकण्यात आल्याचा आरोप वेन्नीयार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय. तसेच वेन्नीयार समुदायाविषयीचे दृष्य चित्रपटातून काढून टाकावीत, अशी मागणीही करण्यात आलीय. चित्रपटात दाखवलेला ‘अग्नी कुंदम’ हे प्रतिक वेन्नीयार समुहाची ओळख आहे, असंही त्यांनी म्हंटलंय.

हेही वाचा: Election 2021 : दहा जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात

या कायदेशीर नोटिसीत वेन्नीयार समाजाच्या प्रदेशाध्यक्षांनी चित्रपटातून बदनामी करणारी ती सर्व दृश्ये काढून टाकण्याची मागणी केलीय. तसेच ‘अग्नी कुंदम’ या चिन्हाचा चित्रपटात जाणीवपूर्वक समावेश करण्यात आल्याचा दावाही नोटिसीत करण्यात आलाय. चित्रपटातील वादग्रस्त दृश्य हटवण्याच्या मागणीसोबतच 7 दिवसांत 5 कोटींची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आलीय.

हेही वाचा: 'दलितांच्या 10 वेळा घरी जा.. तिथं चहा प्या, जेवण करा आणि मगच मत मागा'

आयएमडीबी रेटिंगमध्येही अव्वल

तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक होतंय. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळालंय. आयएमडीबीनं या चित्रपटाला 9.7 रेटिंग दिलंय.

loading image
go to top