गाैरी लंकेश हत्‍याप्रकरणः मोहनच्या घरी हत्येची पूर्वतयारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने अटक केलेला मोहन नायक शस्त्रास्त्रांचा व्यापारी असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्याच्या घरीच गौरी यांच्या हत्येची पूर्वतयारी करण्यात आल्याचाही तपास पथकाने दावा केला आहे.

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने अटक केलेला मोहन नायक शस्त्रास्त्रांचा व्यापारी असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्याच्या घरीच गौरी यांच्या हत्येची पूर्वतयारी करण्यात आल्याचाही तपास पथकाने दावा केला आहे.

गौरी लंकेश हत्याप्रकरणातील प्रमुख संशयित परशुराम वाघमारे याच्या चौकशीतून मोहन नायक याचे नाव पुढे आले होते. त्यानेच वाघमारेला पिस्तूल दिले होते. त्यामुळे एसआयटी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच त्याला ताब्यात घेतले होते. मोहन नायक हा मडकेरी येथे शस्त्रास्त्रांचा व्यापार करीत होता. कन्नड वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका धार्मिक संस्थेचा तो सक्रिय कार्यकर्ता होता.

अलीकडच्या काळात बाहेरील लोकाची त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ये-जा होती. तो वनस्पती औषधही द्यायचा. रामनगर जिल्ह्यातील कुंबळगोडू येथे त्याने वैद्य शाळा चालविली होती. गौरी लंकेश हत्येनंतर कुंबळगोड सोडून तो मंगळूर जिल्ह्यातील संपजी गावात राहण्यासाठी आला होता. औषधासाठी लोक त्याच्याकडे येत असावेत, असा स्थानिक लोकांचा समज होता. स्थानिक लोकांना त्याच्या घरात प्रवेश दिला जात नसे. स्थानिक लोकांना गेटच्या आत येऊ दिले जात नव्हते. बाहेरून आलेल्या लोकांना मात्र त्याच्या घरात प्रवेश असायचा.

गोवा येथील एका संघटनेमार्फत त्याची अमोल काळेशी ओळख झाली. अटक करण्यात आलेला दुसरा संशयित शिकारीपूरचा प्रवीणसुद्धा मोहन नायक याच्या घरी येत होता. पुढे परशुराम वाघमारे यालाही त्यांनी तेथेच बोलावून आणले. गौरी लंकेशच्या हत्येची पूर्व तयारी त्यांनी मोहन नायक याच्याच घरी केली. पुढे मागडीच्या मुख्य रस्त्यावरील सुरेश यांच्या घरी त्यांनी आपला मुक्काम हलविला. धार्मिक संस्थेच्या नेत्यांची त्याच्या घरी सारखी ये-जा असायची, अशी माहिती स्थानिक लोकांनी तपास अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

Web Title: Karnataka Belgaum News Gouri Lankesh Murder case