
भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) याची निर्घृण हत्या करण्यात आलीय.
Karnataka : कर्नाटकात भाजप नेत्याची हत्या; दक्षिण कन्नड जिल्ह्यात कलम 144 लागू
Karnataka Government : कर्नाटक सरकारचा आज एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज वर्षपूर्तीनिमित्त होणारा कार्यक्रम रद्द केलाय. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केली आहे. भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्यानं भाजपनं (BJP) हा निर्णय घेतलाय.
भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) याची निर्घृण हत्या करण्यात आलीय. आज कर्नाटकातील बोम्मई सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, दोड्डबल्लापूरमध्ये विधानसभेचा अधिकृत कार्यक्रम आणि मेगा रॅली 'जनोत्सव' होणार होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हेही या रॅलीत सहभागी होणार होते. मात्र, इथं तणाव वाढू नये म्हणून दक्षिण कन्नड जिल्हा पोलीस हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलंय. सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच सरकारविरोधात नाराजी आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार यांना घेरलंय. यासोबतच काँग्रेसचे आमदार प्रियांक खर्गे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत.
हेही वाचा: सत्ताधारी पक्षाचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुनच्या दाव्यानंतर टीएमसीचं प्रत्युत्तर
तत्पूर्वी, बुधवारी मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल आणि हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असं आश्वासन दिलंय. मारेकर्यांना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली असून ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. दोषींना लवकरच पकडलं जाईल आणि कठोर शिक्षा करण्यात येईल. मंगळुरू आणि शिवमोग्गा इथल्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.
हेही वाचा: Iraq : इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; आंदोलकांचा संसद भवनावर कब्जा
नेमकं काय आहे प्रकरण?
प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचं दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे भागात पोल्ट्रीचं दुकान होतं. गेल्या मंगळवारी प्रवीण दुकान बंद करून घरी परतत असताना काही दुचाकीस्वारांनी त्याचा मार्ग अडवून प्रवीणवर कुऱ्हाडीनं वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं. या हत्येनंतर कर्नाटकात मोठा तणाव निर्माण झालाय.
Web Title: Karnataka Bjp Yuva Morcha Worker Praveen Nettaru Case Latest Updates Basavaraj Bommai Government One Year Janotsav Program Cancelled
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..