'ते' परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहा, रावतेंचा शिंदे गटावर हल्ला

सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे.
Divakar Rawate vs Eknath Shinde
Divakar Rawate vs Eknath Shindeesakal
Summary

सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे.

सांगली : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली असून उध्दव ठाकरेंची साथ सोडून आमदार-खासदारांसह पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत, त्यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मात्र, राहिलेली शिवसेना (Shiv Sena) वाचवण्यासाठी सेनेतले दिग्गज नेते पुढे सरसावले आहेत.

'जे गेले त्यांना श्रद्धांजली', अशा शब्दात शिवसेना नेते व माजी मंत्री दिवाकर रावते (Divakar Rawate) यांनी मुख्यमंत्री शिंदेसमर्थकांना फटकारलंय. तसंच जे बंडखोर गेले ते शिवसेनेचे कधी नव्हते, भाजप (BJP) बंडखोरांना जवळ करून सेना संपवण्याचं काम करीत आहे, ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना आहे. ती कधीही संपणार नाही, असं ठामपणे सांगतानाच जे गेलेत त्यांना आगामी निवडणुकीत संपवायचं आहे, असं आवाहनही रावतेंनी बोलताना केलं. ते सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

Divakar Rawate vs Eknath Shinde
शिंदेंच्या बंडखोरीमागं भाजपच; उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

रावते पुढं म्हणाले, गेलेली माणसं परत येत नाही त्यामुळं त्यांचा शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा किंवा ते परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहून आणि आपलं काम गतीनं सुरू करू. पूर्वी पेक्षा जास्त ताकदीनं पक्ष उभा राहील. ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आतापासून कामाला लागा. शिवसेनेकडूनच शिवसेना पाडायची हा डाव आहे. त्यांना पाहिजे ते घडवून आणण्याचं काम करीत आहेत. आता जास्तीत जास्त सभासद करा. या लढाईत आपल्याला शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे. एकी करा, पक्ष बळकट करा, असं आवाहनही रावतेंनी केलंय. सांगलीत शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

Divakar Rawate vs Eknath Shinde
..तिच्याकडून चूक झाली असावी; स्मृती इराणींच्या मुलीचं प्रियंका चतुर्वेदींनी केलं समर्थन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com