कर्नाटक : खाते वाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवले 'हे' खाते

आर अशोक यांच्याकडे महसूलचा कार्यभार, तर ईश्वरप्पांकडे ग्रामीण विकास खाते
Karnataka CM Basavaraj Bommai
Karnataka CM Basavaraj Bommaiesakal

बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, जवळजवळ एक आठवड्यात बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत 29 मंत्र्यांचा आपल्या मंत्रीमंडळात समावेश केला. आज नुकतेच खाते वाटप करण्यात आले. राज्यपाल थावरचंद गेहलोत (Governor Thawar Chand Gehlot) यांनी राजभवनात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. दरम्यान, नवीन मंत्र्यांची खाती येत्या एक-दोन दिवसांत जाहीर केली जातील, असे बोम्मई यांनी यापूर्वीच सांगितले होते, त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता होती. आज बंगळूरमध्ये लोकप्रतिनिधींना खाते वाटप करण्यात आले आहे. बोम्मई यांनी आपल्या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांनाही प्राधान्य दिले आहे.

Summary

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, जवळजवळ एक आठवड्यात बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत 29 मंत्र्यांचा आपल्या मंत्रीमंडळात समावेश केला.

Karnataka CM Basavaraj Bommai
कोयनेसह वारणा खोरे 57 वर्षांत 1,21,137 भूकंपांनी हादरले!

या खाते वाटपात बसवराज बोम्माई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासह वित्त खाते असणार आहे. तर के.एस ईश्वरप्पा यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज विकासचा पदभार दिला आहे. आर अशोक यांच्याकडे महसूलचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर बी श्रीरामुलू यांच्याकडे परिवहन खाते, तर कल्याण गोविंदा करजोळ यांच्याकडे मध्यम सिंचनचा पदभार देण्यात आला आहे. तसेच आमदार शशिकला जोल्ले यांना मजुराई, धर्मादाय खाते दिले असून आमदार उमेश कत्ती यांना वन आणि अन्न व नागरी पुरवठा खाते दिली गेले आहे.

Karnataka CM Basavaraj Bommai
सनसनीखेज आरोप करण्यापलिकडं चित्रा वाघांना काही येतं?
  • व्ही सोमन्ना : गृहनिर्माण, पायाभूत सुविधा विकास

  • अंगारा एस : मत्स्यपालन आणि आंतरदेशीय वाहतूक

  • जेसी मधु स्वामी : लघू सिंचन व संसदीय कामकाज

  • अरागा ज्ञानेंद्र : गृह विभाग

  • डॉ. अश्वथ नारायण सीएन : उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com