चक्क मुख्यमंत्री शाळेत झोपले चादर टाकून!

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

- चंदकी गावातील यादगीर या सरकारी शाळेत काढली त्यांनी झोप.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री म्हटलं की पोलिसांच्या गाड्यांचा ताफा, मोठी सुरक्षा यंत्रणा, राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी याला अपवाद ठरत आहेत. कारण त्यांनी चक्क सरकारी शाळेच्या वर्गातील फर्शीवर पांढरी चादर टाकून विश्रांती घेतली.

साधी राहणी असलेले मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांचे नाव राज्यात प्रसिद्ध आहे. सध्या ते 'व्हिलेज स्टे प्रोग्राम'अंतर्गत राज्यातील विविध गावांचा दौरा करत आहेत. काल (शुक्रवार) ते कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हेरुर गावात दाखल झाले होते. त्याचवेळी या गावात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आपला नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला. 

त्यानंतर त्यांना चंदकी गावातील यादगीर या सरकारी शाळेत थांबावण्यात आले होते. यावेळी कुमारस्वामी शाळेच्या वर्गातील फर्शीवर पांढरी चादर टाकून झोपी गेल्याचे समोर आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka CM Kumaraswamy Slept at School