कर्नाटक बेळगांवला करणार दुसरी राजधानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

ळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच काही सरकारी कार्यालये बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मांडला आहे. कानडी-मराठी वाद बेळगावला नवीन नाही. त्यामुळेच, बेळगावचे बेळगावी असं नामकरण करण्यात आले होते. तसेच या भागातील विकासाला चालना देण्यासाठी बेळगावला दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारात आहे.

बंगळूरू - बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच काही सरकारी कार्यालये बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मांडला आहे. कानडी-मराठी वाद बेळगावला नवीन नाही. त्यामुळेच, बेळगावचे बेळगावी असं नामकरण करण्यात आले होते. तसेच या भागातील विकासाला चालना देण्यासाठी बेळगावला दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारात आहे.

मी 2006 पासून बेलगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तेंव्हापासून या प्रस्तावाचा विचार झाला नाही. परंतु, आता पुन्हा या प्रस्तावाचा विचार करण्यात येईल, असे कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितले. बेळगावमध्ये काही सरकारी खाती सुरू करण्याचाही विचार असून लहान सहान कारणांसाठी कलबुर्गी, धारवाड, हुबळी इथल्या लोकांना बंगळूरुला यावं लागू नये, अशी सोय करण्यात येईल. संयुक्त महाराष्ट्रवादी आंदोलकांची सीमाभागातील काही भाग महाराष्ट्रात सामील करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. कानडी-मराठी असं यावादाचं स्वरूप असून, या कारणासाठी अनेकवेळा आंदोलनं झालेली आहेत.

सीमाभागातल्या मराठी शाळांची गळचेपी व कानडीची सक्तीसारख्या अनेक गोष्टी इथल्या मराठी जनतेवर लादण्यात आल्याचे अनेकवेळा समोर आले आहेत. त्याखेरीज आता उत्तर कर्नाटकातल्या 13 जिल्ह्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली असून कुमारस्वामी यांच्या सरकारसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देऊन हा वाद कमी करण्याचा कुमारस्वामींचा प्रयत्न आहे.

Web Title: Karnataka Cm Kumarswami Proposes Second Capital Status For Belgum