Love Jihad : ''नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येप्रकरणात लव्ह जिहाद नाहीच!'', भाजपकडून राजकारण सुरु असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

भाजपकडून सातत्याने पीडितेचा मृत्यू लव्ह जिहादमुळे झाल्याची विधानं केली जात आहेत. काँग्रेसने मात्र ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते, असं म्हटलंय. आता खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Congress Leader Siddaramaiah
Congress Leader Siddaramaiahesakal

बंगळूरुः कर्नाटकातल्या हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाच्या २३ वर्षीय मुलीचा खून करण्यात आला. फैयाज नावाच्या मुलाने चाकूने भोसकून तिला ठार केलं. त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी आता राजकारण तापलेलं आहे. भाजपकडून सातत्याने पीडितेचा मृत्यू लव्ह जिहादमुळे झाल्याची विधानं केली जात आहेत. काँग्रेसने मात्र ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते, असं म्हटलंय. आता खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

Congress Leader Siddaramaiah
Ajit Pawar : पूर्वी आम्ही फक्त राबत होतो आता मोदींमुळे आमचीही आदानी अंबानी यांच्याशी होतीय ओळख, अजित पवारांचा दावा

मृत मुलीच्या वडिलांनी काय म्हटलं?

फैयाज हा जुना विद्यार्थी होता. त्याने माझ्या मुलीला प्रपोज केलं होतं. परंतु तिने त्याचं प्रपोजल नाकारलं होतं. तिला फैयाज आवडत नव्हता, त्यामुळे ती या सगळ्यापासून दूर राहू इच्छित होती. म्हणूनच तिचा खून करण्यात आल्याचं मृत मुलीच्या नगरसेवक वडिलांनी सांगितलं.

घटनेपूर्वी आरोपीसोबत माझं बोलणं झाल्याचंही मुलीच्या वडिलांनी सांगितलं. दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलीनेही लग्नास नकार दिला होता, असं ते म्हणाले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजपवर आरोप केले असून केवळ भीतीचं वातावरण तयार केलं जात असल्याचं ते म्हणाले.

Congress Leader Siddaramaiah
Supreme Court: तुम्ही पॉर्न का डाउनलोड केले? प्रतिवादींचे उत्तर एकूण CJI चंद्रचूड आश्चर्यचकित, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री काय म्हणाले?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया म्हणाले की, हा लव्ह जिहादचा प्रकार नाही. या प्रकाराचा मी निषेध करतो. घटनेतील आरोपीला अटक करण्यात आलेली असून पुढील तपास गांभीर्याने सुरु आहे. आरोपीला कठोर शासन व्हावं, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. घटनेचं भाजपकडून राजकारण सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com