Karnataka : लिंबू हातात घेणाऱ्या आमदाराच्या हातात नारळ कसा? मुख्यमंत्र्यांचा सवाल अन् सभागृहात एकच..

नारळाची किंमत वाढवायला हवी. नारळाच्या दरात वाढ करणार असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
CM Siddaramaiah HD Revanna
CM Siddaramaiah HD Revannaesakal
Summary

माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मध्यस्थी करत किमान रेवण्णासाठी नारळाच्या किमती वाढवायला हव्यात, असे सांगितले.

बंगळूर : हातात लिंबू (lemon) घेणाऱ्या रेवण्णांच्या हातात नारळ (Coconut) कसा? असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी केला, तेव्हा सभागृहात हशा पिकला. धजदचे आमदार एच. डी. रेवण्णा काल नारळ हातात घेऊन सभागृहात आले आणि त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधलं.

त्यावरुन सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी विनोद केला. राज्यपालांच्या भाषणावर आभारप्रदर्शनावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे आले, तेव्हा रेवण्णा उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘नारळाची किंमत वाढवायला हवी. नारळाच्या दरात वाढ करणार असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. ते केले पाहिजे.

शिवकुमार यांनी घोषणा केली आहे की, नारळाची किमान आधारभूत किंमत १५ हजार रुपये केली जाईल.’’ माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मध्यस्थी करत किमान रेवण्णासाठी नारळाच्या किमती वाढवायला हव्यात, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com