कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा अपघातात मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

सिद्धू न्यामागौडा यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे, की पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जामखंडीचे आमदार सिद्धु न्यामागौडा यांच्या अपघाती मृत्यूचे खूप दुःख आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.

बंगळूर : कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामागौडा यांचे रविवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला. गोव्याहून बागलकोटकडे येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामागौडा हे बागलकोटकडे येत असताना तुलसीगिरी येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ते 63 वर्षांचे होते. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते जामखंडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या श्रीकांत कुलकर्णी यांचा 2795 मतांनी पराभव केला होता. 

सिद्धू न्यामागौडा यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे, की पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जामखंडीचे आमदार सिद्धु न्यामागौडा यांच्या अपघाती मृत्यूचे खूप दुःख आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.

Web Title: Karnataka Congress MLA Siddu Nyama Gowda dies in road accident near Tulasigeri