Karnataka Chief Minister Siddaramaiah reacting strongly amid controversy over alleged misbehavior by a senior police officer involving a woman.

Karnataka Chief Minister Siddaramaiah reacting strongly amid controversy over alleged misbehavior by a senior police officer involving a woman.

esakal

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

Karnataka DGP Controversy : ही घटना शासकीय कार्यालयात घडली आहे, जिथे अधिकृत बैठका आणि प्रशासकीय काम चालते; जाणून घ्या, डीजीपींनी यावर काय म्हटलय?
Published on

CM Siddaramaiah Reacts Strongly to DGP Incident : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूमध्ये तैनात असलेले डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्र राव यांच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या या घटनेवर खूप संतापले आहेत. अधिकाऱ्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची किंवा कायदेशीर कारवाईची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "मला आज सकाळी याबद्दल समजले आहे आणि मी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. यात कोणीही सहभागी असो, ते कोणत्याही पदावर असो, कोणीही कायद्याच्या वर नाही. मी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि योग्य ती कारवाई केली जाईल."

आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्र राव यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये राव त्यांचा अधिकृत गणवेश घालून आणि कर्तव्यावर असताना सरकारी कार्यालयात एका महिलेसोबत असभ्य वर्तन करताना दिसत आहेत.

Karnataka Chief Minister Siddaramaiah reacting strongly amid controversy over alleged misbehavior by a senior police officer involving a woman.
Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये अधिकारी महिलेला मिठी मारत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. ही घटना सरकारी दालनात घडली आहे, जिथे अधिकृत बैठका आणि प्रशासकीय काम चालते.

Karnataka Chief Minister Siddaramaiah reacting strongly amid controversy over alleged misbehavior by a senior police officer involving a woman.
Vande Bharat Sleeper Train News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! देशातील पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’साठी बुकींग झाले सुरू

दरम्यान, डीजीपींनी व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचे म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओबाबत डीजीपी रामचंद्र राव म्हणाले, "मी माझ्या वकिलाशी बोलून कारवाई करेन. मलाही धक्का बसला आहे. हे सर्व खोटे आणि बनावट आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि सत्य उघड झाले पाहिजे. मी गृहमंत्र्यांना कळवले आहे की हे सर्व खोटे आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com