Human Skeletons Found in Dharmasthala : कर्नाटकातील सुप्रसिद्ध 'धर्मस्थळ' पुन्हा एकदा धक्कादायक उघडकीमुळे चर्चेत आले आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या हत्या, बलात्कार आणि मृतदेहांच्या बेकायदेशीर दफन प्रकरणाच्या चौकशीत विशेष तपास पथकाला (SIT) अकराव्या ठिकाणी मानवी सांगाड्यांचे अवशेष आढळले आहेत. या शोधामुळे या प्रकरणाची भयावहता आणखी वाढली आहे.