कर्नाटकात तिघांचा बुडून मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

चिदानंद हा वाणिज्य शाखेत शिकणारा विद्यार्थी मोटारीतून त्याच्या बहिणीच्या तिघा मुलांना घेऊन चालला होता. त्याचे नियंत्रण सुटल्याने मोटार या टाकीत पडली. त्यामध्ये चिदानंद आणि तिघे मुले बुडाले. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु चिदानंद आणि शशांक आणि इंपाना यांचा मृत्यू झाला

रामनगर  - कंचुगराण जिल्ह्यात एका पाण्याने भरलेल्या टाकीत मोटार पडल्याने मोटारीतील एक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दोन मुलांसह तिघे जण बुडाले. एका मुलाला वाचवण्यात तेथील ग्रामस्थांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंचुगराण रस्त्याच्या कडेला असलेली ही पाण्याची टाकी गेल्या काही वर्षांपासून वापरला जात होती; परंतु पावसा अबावी गेली तीन वर्षे ती कोरडी होती. जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ही टाकी पाण्याने संपूर्ण भरली होती.

चिदानंद हा वाणिज्य शाखेत शिकणारा विद्यार्थी मोटारीतून त्याच्या बहिणीच्या तिघा मुलांना घेऊन चालला होता. त्याचे नियंत्रण सुटल्याने मोटार या टाकीत पडली. त्यामध्ये चिदानंद आणि तिघे मुले बुडाले. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु चिदानंद आणि शशांक आणि इंपाना यांचा मृत्यू झाला.

Web Title: karnataka drowning

टॅग्स