Why did elephants attack at Dubare Camp?
esakal
Karnataka Elephant Attack Viral Video : कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘दुबारे हत्ती शिबिरा’मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, दोन हत्तींमध्ये झालेल्या झुंजीत तामिळनाडूतील ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. हत्तींना स्नान घालण्याची प्रक्रिया सुरू असताना ही महिला आपल्या कुटुंबासह शिबिरात उपस्थित होती. अचानक दोन हत्ती एकमेकांवर तुटून पडल्याने निर्माण झालेल्या गोंधळात ती महिला त्यांच्या कचाट्यात सापडली.