
उपमुख्यमंत्री फ्लायओव्हरचं काम पाहण्यासाठी चक्क दुचाकीवरून गेले होते. त्यांच्या दुचाकीवरून पाहणीपेक्षा आता त्या दुचाकीची चर्चा होत आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हेब्बाळ फ्लायओव्हरची पाहणी करायला गेले होते. ते ज्या दुचाकीवर गेले त्यावर तब्बल १८ हजार ५०० रुपये दंड आहे. तर वाहतुकीच्या नियमांचं ३४ वेळा उल्लंघन केलं असल्याचा आरोप भाजपने केलाय.