Karnataka Election : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; 5 लाखांच्या कर्जाबाबत मोठी घोषणा

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक 2023 ची रणधुमाळी सुरू आहे.
Karnataka Election
Karnataka Election

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक 2023 ची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने चांगलाच जोर लावला आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजप सरसावला आहे. दरम्यान, भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. (Karnataka election 2023 BJP releases Praja Dhwani election manifesto )

पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बंगळुरू येथे जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी पक्षाने, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना 3 स्वयंपाक गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले. तसेच, समान नागरी संहितेचे आश्वासनही दिले आहे.

Karnataka Election
राजकारणासाठी शिवरायांचे नाव घेणाऱ्यांना...; कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात रोहित पवार कडाडले

भाजपने जाहीरनाम्यात सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. हे मोफत गॅस सिलिंडर उगादी, गणेश चतुर्थी आणि दीपावली सणानिमित्त दिले जातील.

तसेच ‘पोषण’ योजना सुरू केली जाईल. याद्वारे प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि मासिक रेशन किटद्वारे ५ किलो श्री अण्णा- सिरी धान्य दिले जाणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे.

Karnataka Election
'त्या' कबरीला का लावलं होतं कुलूप? Viral झालेल्या फोटोमागचं खरं सत्य आलं समोर | Fact Check

कर्नाटकात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एका उच्चस्तरीय स्थापन केली जाणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

Karnataka Election
CJI Chandrachud : सरन्यायाधीशांच्या या निर्णयाने मने जिंकली! कायदा मंत्र्यांनी केलं चंद्रचूड यांचं कौतुक

एससी एसटी कुटुंबातील महिलांसाठी पाच वर्षांसाठी 10 हजार रुपयांची एफडी.

जागतिक दर्जाच्या मानकांनुसार सरकारी शाळांचा दर्जा वाढवा यासाठी प्रयत्न

ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी

कल्याण सर्किट, बनवासी सर्किट, परशुराम सर्किट, कावेरी सर्किट, गंगापुरा सर्किटसाठी 2500 कोटी

5 लाखांच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही

5 किलो तांदूळ आणि 5 किलो भरड धान्य देण्याची घोषणा

शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com