DK Shivakumar : निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका; थेट प्रदेशाध्यक्षांवरच गुन्हा दाखल!

कर्नाटकात पुढील महिन्यात 10 मे रोजी विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) होणार आहेत.
DK Shivakumar
DK Shivakumaresakal
Summary

निवडणुकीत पैशाच्या बळाचा वापर ही काही नवी गोष्ट नाहीये, पण भारताच्या दक्षिणेकडील राज्यात याचा मोठा वापर होत आहे.

श्रीरंगपट्टण : कर्नाटकात पुढील महिन्यात 10 मे रोजी विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) होणार आहेत. याआधीच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलाय.

अलीकडंच, श्रीरंगपट्टणच्या दौऱ्यात शिवकुमार यांनी भररस्त्यात नोटा उडवल्या होत्या. याप्रकरणी मंड्या पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

DK शिवकुमार यांनी 28 मार्च रोजी श्रीरंगपट्टण इथं रोड शो केला होता. या रोड शोमध्ये काही कलाकार काँग्रेसचा प्रचार करत होते. यावेळी आपल्या प्रचाराच्या वाहनाच्या छतावर उभं राहून डीके शिवकुमार या कलाकारांवर 500-500 च्या नोटा उडवताना कॅमेऱ्यात कैद झाले.

DK Shivakumar
Karnataka Election : भाजपला पराभवाची भीती? Exit Poll जाहीर होताच कर्नाटकात मोदींच्या तब्बल 20 सभा!

भाजपनं याला मुद्दा बनवून कारवाईची मागणी केली होती. त्याचवेळी शिवकुमार यांनी कलाकारांना सन्मान देण्यासाठी पैसे दिल्याचं म्हटलं होतं. निवडणुकीत पैशाच्या बळाचा वापर ही काही नवी गोष्ट नाहीये, पण भारताच्या दक्षिणेकडील राज्यात याचा मोठा वापर होत आहे.

DK Shivakumar
Haridwar Court : RSS ला कौरव म्हणणं राहुल गांधींना भोवणार; कार्यकर्त्यानं दाखल केला मानहानीचा खटला

कर्नाटकपासून केरळपर्यंत राजकीय पक्ष मतदारांना पैसे, दागिने, साड्या, टीव्ही इत्यादी वस्तू देण्याचं आमिष देत असतात. कर्नाटकबद्दल बोलायचं झालं तर भाजप सरकार 40 टक्के कमिशन घेऊनच काम करतं, असा आरोप काँग्रेस करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com