Indian Army : ..तर जवानाचं मतदानच रद्द होण्याची शक्यता; बॅलटपेपर दाखवतानाचा फोटो व्हायरल

मतदान करताना जवानानं स्वतःचा काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Karnataka Election 2023 Indian Jawan
Karnataka Election 2023 Indian Jawanesakal
Summary

एका जवानाने स्वत: त्याच्या बॅलेट पेपरसह फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

बंगळूर (कर्नाटक) : मतपत्रिकेसोबत मतदान करताना जवानानं स्वतःचा काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) मतपत्रिकेद्वारे मतदान सुरू केले आहे. हजारो जवानांनी (Jawan) आधीच मतदान केले आहे. पण एका जवानाने स्वत: त्याच्या बॅलेट पेपरसह फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

Karnataka Election 2023 Indian Jawan
Karnataka Election : आम्हीच मुस्लिमांचं आरक्षण संपुष्टात आणलं; भरसभेत अमित शहांनी छातीठोकपणे सांगितलं

ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा जवान के. आर. नगर मतदारसंघाचा मतदार असल्याचे पोस्टावरून कळते. कर्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याबाहेरून पोस्टल मतदान केल्याचे बोलले जात आहे. गुप्त मतदान असतानाही त्याने कोणाला मतदान केले, हे उघड झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडून जवानाचे मत रद्द होण्याची शक्यता आहे. १० मे रोजी मतदान होणार आहे. जिथे ही घटना घडली के. आर. नगर मतदारसंघात आमदार सा. रा. महेश (धजद), डी. रविशंकर (काँग्रेस), होसहळ्ळी व्यंकटेश (भाजप) रिंगणात आहेत.

Karnataka Election 2023 Indian Jawan
Karnataka : 'या' काँग्रेस नेत्यांचा पराभव करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लान; भाजप रणनितीकारांनी लावली ताकद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com